• ( 02422 ) 246491 , 246492.
  • ashokssk_anr@ashoksugar.com
WATER SHED DEVELOPEMENT PROGRAMME:अशोक बंधारे प्रकल्प

योजना भान ठेऊन आखा आणि त्या बेभानपणे राबवा या उक्तीनुसार सन १९८७ नंतर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात " WATER SHED DEVELOPEMENT PROGRAMME" ची अंमलबजावणी सुरु झाली. जलसंवर्धनाचा हा कार्यक्रम "अशोक बंधारे प्रकल्प" म्हणून नावारूपास आला.

ओढ्या नाल्यावर जेथे योग्य जागा असतील तेथे रिकाम्या सिमेंट गोण्यांचे बंधारे, बॉयलर ट्युबचे बंधारे, अशोक पद्धतीचे बंधारे, दगडी साठवण बंधारे बांधण्यात आले.

याशिवाय पावसाचे पाणी वाहून जाण्यची तेथे शक्यता आहे, अशा ठिकाणी अशोक पाझर तलाव, अशोक तळे, अशोक शेततळे, अशा पाणी साठवून ठेवणाऱ्या तळ्यांचे जाळे निर्माण करण्यात आले.

आमदारकीच्या सत्तेच्या माध्यमातून गोदावरी तसेच प्रवरा नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची मालिका पूर्णत्वास नेण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती (श्रीरामपूर)आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याने कार्यक्षेत्रात योग्य ठिकाणी दगडी साठवण बंधारे , रोजगार हमीतून पाझर तलाव, तसेच "गाव तेथे तळे" या नुसार प्रत्येक गावासाठी किमान एक गावतळे करण्यात आले.

श्री. मुरकुटे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राबविलेल्या "WATER SHED DEVELOPEMENT PROGRAMME" अंतर्गत कार्यक्षेत्रात जलसंवर्धनाची २६७ कामे झाली. या कामामुळे दरवर्षी पावसाळ्यात किमान ५ वेळा पाणी अडवून जिरवण्याची प्रक्रिया गृहीत धरल्यास सुमारे १०२५ द. ल. घ. फुट (एक टी. एम. सी.) पाणी भूगर्भात जिरण्याची प्रक्रिया घडत आहे. याद्वारे बंधारा लाभ क्षेत्रात एकूण १७०० हेक्टर (४२५० एकर )इतक्या क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे.

याशिवाय भंडारदरा धरणाच्या वाटप निर्णयानुसार हक्काचे पाणी मिळविण्यासाठी श्री. मुरकुटे यांनी आमदारकीच्या माध्यमातून तसेच वेळ प्रसंगी आंदोलने, चळवळी अशा संघर्षाद्वारे प्रयत्न केला. या सर्वकष प्रयत्नांमुळे सन १९८७ साली अवघी ३५ हजार टन उसाच्या उपलब्धतेत सन २००० पर्यंत ७ लाख टनापर्यंत विक्रमी वाढ झाली. उसाच्या बाबतीत कारखाना स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनला.

सन १९९९ साली कार्यक्षेत्रात ७ लाख टनापेक्षा अधिक उस उपलब्ध झाला. कारखान्याची गरज भागवून २ लाख टन बाहेरील कारखान्याला द्यावा लागला. उसाबाबत इतकी स्वयंपूर्णता सध्या झाली. याचे श्रेय श्री.मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या जलसंवर्धानाच्या सर्वंकष कार्यक्रमास जाते.