• ( 02422 ) 246491 , 246492.
  • ashokssk_anr@ashoksugar.com
WATER SHED DEVELOPEMENT PROGRAMME:अशोक बंधारे प्रकल्प

कारखान्याचे व्यवस्थापन करताना सहकाराच्या मुलभूत हेतू आणि तत्वाचे भान राखले जाते. सामजिक बांधिलकी ठेवली जाते. अशा बांधिलकी मधून श्री. मुरकुटे स्वतः सभासद व शेतकरी युवक तसेच महिलांसाठी "प्रापंचिक व व्यावहारिक शिबिरे" , "व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम " , " विविध सामाजिक चर्चासत्रे " आयोजित करतात.

समाजातील युवकांना योग्य दिशा देण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक व्यासपीठ देण्याचे भान व्यवस्थापनाने राखले आहे. खेळाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक विकास होतो, तर कला क्षेत्राच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते.यासाठी अशोक जिमखाना, अशोक कलामंच, अशोक युवा मंच, अशोक महिला मंच, अशोक ग्रंथालय, अशी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासपीठे उभी केली आहेत.

कारखान्याच्या सुरक्षा विभागाचे बँडपथक हे या परिसरातील खास आकर्षण आहे. या बँडपथकाने अल्पावधीत जिल्ह्यात नावलौकिक मिळविला. विविध शासकीय व सामाजिक समारंभासाठी बँड पथकास सन्मानाने निमंत्रित केले जाते.