सहकाराच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील अभिनव उपक्रम

  • अशोक कारखाना सलग्न अँग्रो इंडस्ट्रीज एज्युकेशन अँन्ड डेव्हलपमेंट फौंडेशनच्या माध्यमातून कारखान्याच्या मालकीच्या अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेची कारखाना कार्यक्षेत्रातील शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने स्थापना करण्यात येऊन सन १९९२-९३ पासून तर आजतागायत परिसरातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन तांत्रिक, शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले.याच प्रयत्नातून कारखाना कार्यस्थळावर खालील प्रमाणे शैक्षणिक संस्थांचे संकुल उभे राहिले आहे.

  • जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकरिता कारखान्याने जमीन उपलब्ध करून दिल्याने तेथे सर्व शिक्षा अभियानातून १६ खोल्यांची अद्ययावत इमारत सन २००८ मध्ये उभी राहिली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील अशा प्रकारची सर्वसोयीनी युक्त अशी पहिली इमारत आहे.
  • रयत शिक्षण संस्थेच्या भास्करराव गलांडे पाटील विद्यालयासाठी इमारत आणि मैदानासाठी कारखान्याने जागा उपलब्ध करून दिली आहे.

  • कारखाना कार्यस्थळावर भास्करराव गलांडे पाटील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करून याव्दारे तांत्रिक शिक्षणाची सुविधा अत्यंत माफक खर्चात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

  • अशोक कारखाना कार्यस्थळावर कनिष्ट महाविद्यालय तसेच अशोक कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरु केले आहे. यामुळे विद्यार्थ्याना नजीकच्या अंतरावर महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

  • अशोक कारखाना कार्यस्थळावर कार्यक्षेत्रातील खेळाडूंच्या सर्वंकष विकासासाठी अशोक कारखाना व अशोक साखर कामगार सभेच्या सयुंक्त सहकार्यातून "अशोक स्टेडीअम " ची उभारणी करण्यात आली आहे.

  • कारखाना परिसरातील लहान मुलांसाठी अद्ययावत खेळणी, वैज्ञानिक माहिती , विविध शोभेच्या झाडांनी युक्त असे बालोद्यान कार्यान्वित आहे.

  • याशिवाय कारखान्याचे श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयाच्या उभारणीसह तालुक्यातील अनेक गावामधील हायस्कूलच्या उभारणीसाठी आर्थिक योगदान व सहकार्य दिले. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात आणि श्रीरामपूर शहरात विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था झाली.

भास्करराव गलांडे पाटील आय.टी.आय


मा.श्री.बी.के.मुरकुटे साहेब यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली ऑगस्ट १९९१ मध्ये अशोकनगर ता. श्रीरामपूर येथे अँग्रो इंडस्ट्रीज एज्युकेशन अँन्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन अंतर्गत आय.टी आय. ची स्थापना केली. पुढे संस्थेचे नामकरण माजी आमदार श्री. भास्करराव गलांडे पाटील यांचे नावे करून संस्थेचे नाव भास्कराव गलांडे पाटील औदयोगिक प्रशिक्षण केंद्र, असे करण्यात आले.

सध्या भास्करराव गलांडे पाटील आय.टी आय मध्ये फिटर, ईलेक्ट्रीशियन व वेल्डर असे एकूण ३ ट्रेड व ६ तुकडया कार्यरत असून ११६ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. संस्थेमध्ये वसतिगृहाची सोय असून दरवर्षी संस्थेमध्ये कॅंपस इंटरव्ह्यु आयोजित केले जातात. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी निरनिराळ्या नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असून अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करून स्वयंरोजगार निर्माण केला आहे. संस्थेमध्ये सर्व आधुनिक हत्यारे, साहित्य व मशिनरी उपलब्ध आहे.